Hosea 1

1होशेय, जो बैरीचा मुलगा यास परमेश्वराचा संदेश मिळाला. त्यावेळी उज्जीया, योथाम, आहाज आणि हिज्कीया हे यहूदाचे राजे होते आणि इस्राएल मध्ये योवाशाचा मुलगा यराबाम राज्य करीत होता. 2हा परमेश्वराचा होशेयला आलेला पहिलाच संदेश होता, तो होशेयला म्हणाला,

“जा एका वेश्येसोबत लग्न कर व जी मुले होतील
ती तिच्या जारकर्माचे परिणाम असतील
कारण परमेश्वराचा त्याग करणे
हे जारकर्म हा देश करीत आहे.”

3म्हणून होशेयने ने दिब्लाइमाची मुलगी गोमर हिच्याशी लग्न केले. ती गरोदर राहिली व तिला मुलगा झाला. 4परमेश्वर होशेयला म्हणाला,

त्याचे नाव इज्रेल ठेव,
कारण काही वेळानंतर
मी येहूच्या घराण्याला
त्यांनी इज्रेल येथे केलेल्या रक्तपातामुळे शिक्षा
करणार आहे व इस्राएल
घराण्याच्या राज्याचा शेवट करीन.
5त्या दिवशी
मी इज्रेलच्या दरीत इस्राएलचे धनुष्य मोडेन.

6गोमर पुन्हा गरोदर झाली आणि तिला मुलगी झाली

तेव्हा परमेश्वर होशेय ला म्हणाला
हिचे नांव लो-रुहामा ठेव
कारण यापुढे मी इस्राएल राष्ट्रावर दया
करणार नाही व त्यास क्षमा करणार नाही.
7तरीही मी यहूदाच्या घराण्यावर दया करीन
मी परमेश्वर त्यांना धनुष्य, तलवार, लढाई,
घोडे किंवा घोडेस्वार यांच्या बळाने नाही
तर त्यांना स्वबळाने सोडवेल.

8मग लो-रुहामाचे दुध तुटल्यावर गोमर गर्भवती होऊन तीला मुलगा झाला. 9मग परमेश्वर म्हणाला,

त्याचे नांव लो-अम्मी ठेव,
कारण तुम्ही माझे लोक नाही
आणि मी तुमचा देव नाही.

10जरी इस्राएलच्या लोकांची संख्या

समुद्राच्या वाळूकणांसारखी असेल
जी मोजता येत नाही
हे असे घडेल की,
जिथे तुम्ही माझे लोक नव्हते
तेथे त्यांना जिवंत देवाचे पुत्र असे म्हणतील.
यहूदाचे लोक व इस्राएलचे
लोक एकत्र येऊन आपणावर
एक पुढारी नेमतील
व त्या देशातून निघून येतील
तेव्हा इज्रेलाचा दिवस महान होईल.
11

Copyright information for MarULB