Isaiah 18

कूशाविषयीचे भाकित

1कूशातील नद्यांच्या पलीकडील सळसळणाऱ्या पंखाच्या देशा हायहाय;
2जो समुद्रातून, लव्हाळ्यांच्या पात्रातून जलावर वकील पाठवतो.
शीघ्रगती दूतांनो, त्या उंच आणि मनमिळावू राष्ट्रांकडे,
जे लोक भीतीपासून दूर व जवळ आहेत त्यांच्याकडे, जे बलवान व अजिंक्य राष्ट्र,
ज्याची भूमी नद्यांनी विभागली आहे त्याच्याकडे जा,

3अहो जगातल्या सर्व रहिवाश्यांनो आणि जे कोणी पृथ्वीवर राहणाऱ्यांनो,

जेव्हा पर्वतावरून निशाण उंचविण्यात येईल तेव्हा पाहा; आणि जेव्हा कर्णा फुंकण्यात येईल तेव्हा ऐका.

4परमेश्वराने मला हे सांगितले आहे की,

जसे सूर्याच्या प्रकाशात उकळणारी उष्णता असते अथवा जसे कापणीच्या उन्हात दहिवरयुक्त अभ्र येते, तसे मी आपल्या निवासस्थानातून शांतपणे निरीक्षण करीन.
5कापणीच्यापूर्वी, जेव्हा बहार संपल्यावर आणि फुले द्राक्षात पिकू लागतात,
तेव्हा तो कोयत्याने डहाळ्या कापील व खाली काढून टाकेल आणि पसरलेल्या फांद्या काढून टाकेल.

6पर्वतावरील पक्ष्यांसाठी आणि पृथ्वीवरील जनावरांसाठी त्या एकत्र टाकून ठेवल्या जातील.

उन्हाळ्यात पक्षी त्यामध्ये राहतील आणि थंडीत पृथ्वीवरील जनावरे त्यावर हिवाळा घालवतील.”
त्या वेळेला, उंच आणि मनमिळावू लोक, भीतीपासून दूर व जवळ असे बलवान व अजिंक्य राष्ट्र, ज्या राष्ट्राची भूमी नद्यांनी विभागलेली आहे ते, सेनाधीश परमेश्वराचे नाव दिलेल्या स्थळी म्हणजे सीयोन डोंगरावर सेनाधीश पमेश्वराला स्वतःचा नजराणा म्हणून अर्पील आणल्या जातील.
7

Copyright information for MarULB