Hosea 13
1एफ्राईम बोलत असे तेव्हा लोकांचा थरकाप होई;तो इस्राएलाचा सरदार झाला;
पण पुढे बआलमूर्तीमुळे दोषी होऊन तो लोपला.
2आता ते अधिकाधिक पाप करु लागले
ते चांदीच्या ओतीव मूर्त्या आपल्या कुशलतेने कारागीर बनवतो
तसे बनवू लागले.
लोक म्हणू लागले,
“जे बलिदान करतात त्यांनी वासरांचे चुंबन घ्या”
3म्हणून पहाटेच्या ढगासारखे लवकर उडून जाणाऱ्या दवासारखे खळ्यातून
वाऱ्याने उडणाऱ्या भुसासारखे
आणि धुराडयातून उडणाऱ्या धुरासारखे ते होतील.
4पण मी तुमचा देव परमेश्वर आहे, ज्याने तुम्हाला मिसरातून बाहेर काढले, माझ्याशिवाय तुम्हाला अन्य देव नाही,
माझ्याशिवाय कोणी तारक नाही.
5मी तुम्हाला रानात,
रुक्ष प्रदेशात जाणून होतो.
6जेव्हा तुम्हाला गायरान मिळाले तेव्हा तुम्ही तृप्त झालात
आणि जेव्हा तुमचे पोट भरले तेव्हा तुमचे हृदय उन्मत्त झाले
त्या कारणास्तव तुम्ही मला विसरले.
7म्हणून मी सिंहासारखा तुमच्याशी वागेन, चित्याप्रमाणे तुमच्या वाटेवर दबा धरुन बसेन.
8जिची पिल्ले चोरी झालीत
अशा अस्वली सारखा मी तुमच्यावर हल्ला करीन, मी तुमचे उर फाडीन,
आणि मादी सिंहाप्रमाणे तुम्हाला खाऊन टाकेन,
जसा वनपशू तुम्हाला फाडून टाकतो.
9इस्राएला हा तुझा नाश आहे जो येत आहे, कारण तू माझ्या म्हणजे तुझ्या सहाय्यकर्त्यांच्या विरोधात गेला आहेस.
10तुझा राजा कोठे आहे?
जो तुझ्या सर्व नगरांचे रक्षण करतो
तुझे अधीपती कोठे आहेत? ज्याविषयी तू मला म्हटले,
“मला राजा आणि अधिपती दे?”
11मी क्रोधाने तुला राजा दिला
आणि रागाने त्याला काढूनही घेतले.
12एफ्राहमाचा अन्याय गोळा केला आहे, त्याच्या अपराधाची रास करण्यात आली आहे.
13प्रसूतिवेदना त्याच्यावर येतील,
पण तो अक्कलशून्य मुलगा आहे,
कारण जन्म घेण्याच्या वेळी तो गर्भातून बाहेर येत नाही.
14मी त्यांना खरोखर अधोलोकाच्या बळापासून सोडवले काय? मी त्यांना खरोखर मरणातून सोडवणार काय?
मरणा तुझ्या महामाऱ्या कोठे?
आण ते इथे कळवळा माझ्या समोरुन लपलेला आहे.
15एफ्राहम आपल्या भावांमध्ये जरी प्रगत झाला, तरी पूर्वेचा वारा येईल,
परमेश्वराचा वारा रानातून येईल
एफ्राहमाचा झरा सुकून जाईल,
त्याच्या विहिरीत पाणी राहणार नाही.
त्यांचा शत्रु त्याच्या सर्व मौल्यवान वस्तू लुटून नेईल.
शोमरोनात दोष येईल, कारण त्याने देवाविरुध्द बंड केले आहे
ते तलवारीने पडतील.
त्यांची लहान मुले आपटली जातील
आणि त्यांच्या गर्भवती स्त्रिया चिरुन टाकण्यात येतील.
16
Copyright information for
MarULB